Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Friday, August 3, 2018

■ दिनांक :- 03/08/2018 ■ वार :- शुक्रवार



            ■  दिनांक :-  03/08/2018  ■
                        वार :-  शुक्रवार  
          
           ■    दिनविशेष : 03 ऑगस्ट     ■
 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

    ■  *ठळक घटना/घडामोडी*   ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

● १७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.

● १९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.

● १९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.

● १९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

● १९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

● १९६०: नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

● १९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

● १९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.

● २०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.

● २००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

     ■   *जन्म/वाढदिवस*   ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

● १८८६: हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)

● १८९८: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)

● १९००: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)

● १९१६: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९७० – मुंबई)

● १९२४: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २००३)

● १९३९: भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म.

● १९५६: १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांचा जन्म.

● १९६०: भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म.

● १९८४: भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा जन्म.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 ■   *मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन*   ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

● १९२९: फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५१)

● १९३०: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८५४)

● १९५७: पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)

● १९९३: अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ मे १९१६)

● २००७: लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३३)

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers