Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Friday, July 27, 2018

      ■  दिनांक :-  28/07/2018  ■
                         वार :-  शनिवार  
          
             ■    दिनविशेष : 28 जुलै     ■

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

          ■   जागतिक दिवस   ■

             ●  जागतिक हेपटायटीस दिन  ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

     ■  ठळक घटना/घडामोडी   ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
पेरू देश



● १८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

● १९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

● १९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

● १९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

● १९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.

● १९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.

● १९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.

● १९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

● १९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.

● १९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.

● २००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

    ■   जन्म/वाढदिवस   ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

● १९०७: टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८३)

● १९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)

● १९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.

● १९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.

● १९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

● १९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च २०१३)

● १९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

● ४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१)

● १७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.

● १८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)

● १९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.

● १९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)

● १९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ – फोंडा, गोवा)

● १९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.

● १९८१: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)

● १९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers