■ ठळक घटना/घडामोडी ■
● ७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
● १६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात
सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.
● १८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित
केले.
● १९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
● १९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३०
किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
● १९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.
● १९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव
गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
● २०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ.
राजकुमार यांचे अपहरण केले.
● २०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा
प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला
जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
● २००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन
मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
● २०१२: दिल्लीतील पावर ग्रिड खराब
झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित
झाली.
● २०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड
कोसळून ५० ठार.
No comments:
Post a Comment