31जुलै
हा
या वर्षातील २१२ वा (लीप वर्षातील २१३ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना
२००१ : समाजात मूलभूत स्वरुपाची
क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी
शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
१९९२ : सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन
मॅगसेसे पुरस्कार जाहीर
जन्मदिवस / जयंती
१९४७ : मुमताज
– अभिनेत्री
१९४१ : अमरसिंग
चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
१९०७ : दामोदर
धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार
१९०२ : केशवा
तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील
राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण
(१९७६),
१८८० : धनपतराय
श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व
३०० कथा लिहील्या.
१८७२ : लक्ष्मण
रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार
व गाथा संपादक
मृत्यू / पुण्यतिथी
१९८० : मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री
१९६८ : शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर
सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व
लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी
लिहिले.
१८६५ : *जगन्नाथ
ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ* – दानशूर व शिक्षणतज्ञ
No comments:
Post a Comment